बावनकुळेंच्या 'त्या' फोटोवरून नितेश राणेंचा राऊतांना इशारा

Edited by: भरत केसरकर
Published on: November 20, 2023 20:46 PM
views 234  views

सिंधुदुर्ग : मकाऊमध्ये बावनकुळे हे आपल्या कुटुंबा सोबत गेले. कोण एन्जॉय करत असेल तर काय चुकीचं आहे. असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केलाय. चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी ट्विट केलाय या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. बावनकुळे स्वत:च्या कुटुंबा सोबत गेलेले, संजय राऊत बाहेर जाताना स्वतःचं कुटुंब घेऊन जातो का? यावर आपण पूर्ण एपिसोड करू शकतो. म्हणून एवढं थयथयाट करायची गरज नाही.

बावनकुळे कुठेही चुकले नाहीत. संजय राऊत चीनला कोणासोबत गेले ते सांगू का? तुम्ही मोदींवर बोलता मग तुमच्या मालकाचा मुलगा दिनू मोरयाच्या मांडीवर बसून कुठल्या हळदीच दूध पीत होता. त्याचा ब्रँड सांगू का? संजय राऊत याचा एका खासदार सोबत नाचताना व्हिडिओ तुमच्या कुटुंबाने पाहिला तेव्हा घरात काय काय झालं याची माहिती मला आहे असा प्रतिटोला ही नितेश राणे यांनी लगावलाय.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आज आल्यानंतर बाजप आमदार नितेश राणे मिडीयाशी बोलत होते.