
देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील सन्मित्र मंडळ जामसंडे आयोजित माघी श्री गणेश जयंती उत्सवास मंत्री नितेश राणे यांनी येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी माजी आम. अजित गोगटे यांनी शाल श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळ खडपे, भाजप सरचिटणीस संदीप साटम, अध्यक्ष राजा भुजबळ, सचिव चंद्रकांत पाटकर, कौस्तुभ जामसंडेकर, माजी नगरसेविका प्राजक्ता घाडी, कमलाकर भडसाळे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.