पदाला न्याय द्या ; नितेश राणेंचा नवनियुक्त कोतवालांना कानमंत्र

Edited by: उमेश बुचडे
Published on: September 15, 2023 18:42 PM
views 199  views

कणकवली : प्रत्येक उमेदवाराने आपली बुध्दिमत्ता सिद्ध करून कोतवाल पद मिळवले आहे.आपण ज्या खुर्चीवर बसणार ती खुर्ची जनसेवेसाठी आहे हे लक्षात ठेवा.कोणताही स्वार्थ नको. तुमचा वेळ आणि मेहनत ही जनतेसाठी,देशासाठी आहे हे लक्षात ठेवा.आपल्या कडून जनतेच्या फार अपेक्षा आहेत.आपण ज्या पदावर निवडले गेले आहात त्याला न्याय द्या असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली,देवगड,वैभववाडी  तालुक्यातील ९ कोतवाल पदाची भरती शासकीय प्रक्रिये प्रमाणे झाली.निवड झालेल्या उमेदवारांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितमध्ये  नियुक्त पत्रे देण्यात आली.यावेळी प्रांत अधिकारी जगदीश कातकर,कणकवली तहसिलदार  दीक्षांत देशपांडे, देवगड तहसीलदार आर.जे.पवार, आदी सह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे पुढे म्हणाले,शासनाचा पारदर्शक कारभारासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची सकारात्मक मानसिकता गरजेची आहे.कणकवली विभागाचे काम ज्या पद्धतीने चालू आहे त्याचे खरेच कौतुक केले पाहिजे,अजून काही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत आहेत त्याचा सुद्धा फायदा जनतेने घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.

प्रांत अधिकारी जगदीश कातकर म्हणले,१४  जागा होत्या मात्र आरक्षणात जे उमेदवार आले त्यातून परीक्षा देवून ९ जन उत्तीर्ण झाले आहेत. महसूल विभागाच्या माध्यमातून शासन स्थरावर अजून तलाठी,पोलीसापाठील पदभरती  करत आहे. त्या भरतीचा फायदा सर्वांनी घ्यावा.कणकवली विभागात ९३  पोलीस पाटील पदांच्या भरती होणार आहेत.त्याचाही फायदा घ्यावा.असे आवाहन  प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांनी केले.