
देवगड : देवगड तालुक्यातील कट्टा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे जामसंडे कट्टा येथील मंगेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंबा कलम कोसळून घराचे नुकसान झाले होते. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आमदार नितेश राणे यांनी या नुकसानीची प्रशासकीय यंत्रणेला पाहणी करून सरकारी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार देवगड तहसीलदार संकेत यमगर, तसेच स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून अहवाल शासनाकडे पाठवला आहे.आमदार राणे यांनी स्वखर्चाने घराला लागणारे सर्व सिमेंट पत्रे पाठवण्याची व्यवस्था केली. या - पाहणीदरम्यान जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य मंगेश लोके, सुभाष नार्वेकर आदी उपस्थित होते.