
वैभववाडी : महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. खोरकर अरुळेकर रावराणे समाजाच्या सभागृहात महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दत्तमंदिर येथे प्रचाराचा नारळ फोडून दत्तमंदिर ते राजापूर अर्बन बँकेपर्यंत प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. महायुतीचे उमेदवार नितेश राणेसह भाजपा, शिवसेनेसह मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.