नितेश राणेंचा वाढदिवस ; कणकवली मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे होणार मोफत वाटप

मनोज रावराणेंचा उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 22, 2023 16:47 PM
views 152  views

कणकवली : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून रोजी कणकवली विधानसभा मतदारसंघात 1 हजार 23 छत्र्यांचे मोफत वाटप भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा कणकवली विधानसभा प्रचारप्रमुख मनोज रावराणे स्वखर्चाने करणार आहेत.

देवगड, वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील भाजपाचे बूथ कमिटी अध्यक्ष शक्तिकेंद्रप्रमुख आणि भाजपा कार्यकर्ते यांना मोफत छत्रीवाटप केले जाणार आहे. आ. नितेश राणेंना वाढदिवस शुभेच्छा आणि मोदी @ 9 हर घर संपर्क या अभियानाला समर्थन देण्याचा संदेश या छत्र्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.