
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक दरम्यान दि. १८/१२/२०२१ रोजी संतोष मनोहर परब ( रा.कनकनगर -कणकवली,मुळ करंजे गावठाणवाडी) या कार्यकर्त्यावर हल्ला झाला होता, त्या संदर्भात कणकवली पोलीस स्थानकात कलम ३०७,२०१,१२०(ब),३४ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपींवर दोषारोप पत्र दाखल केले होते. यामध्ये नितेश राणे आरोपी नंबर एक होते. आरोपी नंबर दोन संदेश उर्फ गोट्या सावंत व आरोपी नंबर चार राकेश प्रल्हाद परब हे होते.
या व्यतिरिक्त इतर सुद्धा आरोपी होते या घटनेत एकूण 11 आरोपी होते. या सर्वांच्या विरुद्ध पोलिसांनी जो काही पुरावा तपासा दरम्यान मिळाला होता, तो पुरावा या दोषारोप पत्रासह दाखल केला होता. आरोपीच्या वतीने या प्रकरणात आमचा काहीही संबंध नाही असं आमचं पहिल्यापासून म्हणणं होतं. या तीन आरोपींच्या वतीने (आरोपी नितेश राणे गोठ्या सावंत व राकेश परब) यांच्यावतीने आम्ही दोष मुक्तीचा अर्ज दिला होता. पोलिसांनी जो काही पुरावा गोळा केला होता त्यावरून आरोपीविरुद्ध दोष ठेवला जाऊ शकत नाही. अशा पद्धतीचे विनंती आम्ही न्यायालयाला केली होती. त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून दोष मुक्तता झाली आहे अशी माहिती अॅड. संग्राम देसाई यांनी दिली.
कुडाळ येथील निवासस्थानी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अॅड. संग्राम देसाई बोलत होते यावे अॅड. अविनाश परब, जान्हवी दुधवाडकर, संजना देसाई, सौरभ देसाई उपस्थित होते.
यावेळी अॅड. देसाई म्हणाले की, साक्षी पुरावा घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोशी आहे की नाही हे ठरलं जातं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही अटी शर्ती घालून दिल्या आहेत, त्या अटी शर्ती मध्ये दोषारोप पत्र आहे तसं स्वीकारलं, तरी देखील आरोपी विरुद्ध पुरावा होत नसेल, तर मग आरोपीला दोष मुक्त करावा लागत. कणकवली पोलिसांनी जे दोषारोप पत्र दाखल केलं होतं. त्या संपूर्ण दौषारोपत्रांमध्ये असलेले कागदपत्र जाब जबाब व इतर कागदपत्रे होती त्या सर्वांचा विचार करून आरोपी नंबर एक नितेश राणे दोन गोट्या सावंत व तिसरा राकेश परब या तिघांच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसल्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश क्र.१ चे व्हि.एस.देशमुख यांनी त्यांची दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींची केस चालू राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा खटला होता. असे अॅड. देसाई यांनी सांगितले.










