
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार 26 जुलै 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जागतिक जलतरण क्रीडा स्पर्धेत भारत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल कु. पूर्वा रश्मी संदिप गावडे हिच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:- पत्रकार भवन, सिंधुदुर्गनगरी) दुपारी 2 वाजता अनुसूचित जातीसाठी आयोजित "समाज संवाद व तक्रार निवारण" मेळाव्यास उपिस्थिती. (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह सिंधुदुर्गनगरी). सायं.६ वाजता मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.