गणेशोत्सव काळात भक्तांना सुरळीत वाहतूक सेवा द्या : नितेश राणे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 21, 2025 18:44 PM
views 145  views

सिंधुनगरी : गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सिंधुदुर्गात दळणवळणाचे प्रमुख साधन एस टी वाहतुकीचे आहे. कोकणातील गणेशोत्सवासाठी जवळपास पाच हजार एसटी फेऱ्या होणार आहेत. त्यामधून येणाऱ्या गणेश भक्त प्रवाशांना चांगली सेवा द्या. जिल्ह्यातील कोणत्याही शालेय व अन्य प्रवासी फेऱ्या रद्द होणार नाही याची दक्षता घ्या. असे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी बस वाहतूक नियोजन बैठकीत दिले. 

या वेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, मनीष दळवी विभाग नियंत्रण प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सुजित डोंगरे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय वाहतूक अधीक्षक निलेश लाड अन्य तालुका वाहक नियंत्रण उपस्थित होते. जिल्ह्यात मिनी बसचा प्रभावी वापर करा. व या मिनी बसचा ग्रामीण व शहरी भागातील जनतेला चांगला वापर होईल असे नियोजन करा  अशा सूचनाही मंत्री नितेश राणे यांनी केल्या.