विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांवर आंतरराष्ट्रीय पर्यटक येतील : नितेश राणे

Edited by: साहिल बागवे
Published on: July 13, 2025 20:30 PM
views 23  views

कणकवली  : युनोस्कोमध्ये जागतिक दर्जाच्या किल्ल्यांच्या यादीत सिंधुदुर्गातील दोन किल्ल्यांची नावे जाहीर झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक ठेवा असलेले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा सामावेश आहे . त्यामुळे कालपासून प्रत्येक जण जल्लोष करीत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, खरा शिवाजी महाराजांचा मावळा असल्याची कामगिरी त्यांनी दाखवून दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार यांनी जी-जी कागदपत्रे पुरवली, तसेच खा. नारायण राणे यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यामुळेच या दोन्ही किल्ल्यांचे नाव युनोस्कोच्या यादीत आले आहे. आता या छत्रपतींच्या दोन्ही किल्ल्यांवर ज्वलंत इतिहासाचे जतन आणि विकास आणि संवर्धनासाठी आर्थिक ताकद सरकार देईल. आता आंतरराष्ट्रीय पर्यटक सिंधुदुर्गात येणार असल्याने सिंधुदुर्गाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचा वि‌श्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सिंधुदुर्गाच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. हे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. विरोधकांनाही समजले पाहिजे. तसेच आमच्या मित्र पक्षातील लोकांनाही समजले पाहिजेत. मग सभागृहातील भाषणांची धार कमी होईल. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरण परवानगीमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. राज्य पातळीवरील एमसीझेडएमए कमिटी स्थापन नसल्याने हे प्रकल्प रखडले होते. त्यामुळे निधी परत जायचा. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एमसीझेडएमए कमिटी स्थापन व्हावी. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना भेटून विनंती केली. त्यांनी अधिकाºयांना आदेश दिले होते. राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही पाठपुरावा केला. त्यामुळे आता पर्यावरण परवानगी मिळण्यास मदत होऊन जिल्ह्यातील प्रकल्प मार्गी लागणार आहेत.

सिंधुदुगार्तील महावितरणच्या दुरुस्तीसाठी ७७ कोटींचा नव्याने प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यापैकी महावितरणला १० कोटी आले आहेत, जूने पोल , विदयुत वायर व ट्रान्सफार्मरची कामे होणार आहेत. चिपी विमानतळासाठी १कोटींचा निधी दिला आहे. जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सर्वत्र सीसीटीव्ही करण्याचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला असून लवकरच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने काम होईल. जनतेच्या आशीवार्दामुळे आम्ही बसलो आहोत. त्यामुळे महायुतीचे सरकार सिंधुदुगार्तील प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचे काम करेल. सीवर्ल्ड प्रकल्प स्थानिक आमदार आणि स्थानिक जनता जोपर्यंत सांगत नाहीत, तोपर्यंत होणार नाही. मात्र , अन्य तालुके या प्रकल्पाची मागणी करत आहेत. त्यावर येत्या काळात निर्णय होईल. विजयदुर्ग आणि रेडी ही दोन्ही बंदरे पूर्ण क्षमतेने चालू करण्यात येतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणात किंवा सोनाली गावडे आत्महत्या प्रकरण जिल्हा पोलीस अधिक्षकांना या गुन्ह्यांमध्ये कसुन चौकशी करावी , अशा सुचना दिलेल्या आहेत. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे , त्यामुळे सर्वांना न्याय देण्याची भूमिका माझी राहिलं. आत्महत्या प्रकरणी कोणाचेही दबाव न जुमानता न्याय मिळाला पाहिजे.जनता सुखी समृद्धी राहिली पाहिजे. वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्यात सुप्त संघर्ष आहे. राऊत यांचे पार्सल मुंबईत पाठवण्याचे सुरु आहे. त्याचबरोबर राजकीय कार्यकर्ते काम करत असताना कोणाच्या घरात आम्ही डोकावून पाहत नाही, कायदा सर्वांना सारखा आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई होईल, असेही मंत्री राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. यासंबंधात आरोग्य मंत्र्यांशी माझा पाठपुरावा सुरु आहे. राजकोट पुतळा तयार झाला. याठिकाणी अनिल सुतार यांची कामे प्रलंबित होती.त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी काम हातात घेतले आहे.डागडुजी एकदाच केली जाईल आणि कायमस्वरूपी जनतेला खुले केलं जाईल, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.