
कणकवली : भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी कार्यकर्ते,पदाधिकारी, हितचिंतक यांच्या उपस्थितीत रविवार २३ जून रोजी सकाळी साजरा केला जाणार आहे. केक कापल्यानंतर याच ठिकाणी ते सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. गरजूंना अन्नदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,खाऊ वाटप,फळ वाटप, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात वेगवेगळे कार्यक्रम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेले आहे.तर आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ मोठे बॅनर,फलक,जाहिराती प्रसिद्ध करून उत्साही वातावरण तयार केले आहे.