देवगड : कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचा निकाल नुकताच लागला असून आमदार नितेश राणे हे प्रचंड मताधिक्य मिळवत विजयी झाले आहेत. आमदार राणे यांची ही विधानसभेतली तिसरी टर्म असून मतदार संघातील प्रत्येक प्रभागामध्ये मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. देवगड तालुक्यातील पडेल गावामध्ये देखील खूप मोठे मताधिक्य मिळाले असून या मताधिक्यात पडेल मधील नरगोलवाडीतील मतदारांचा मोलाचा वाटा दिसून येत आहे. गावातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये येणाऱ्या पाच वाड्यांपैकी नरगोलवाडी गावातील सर्वाधिक मतदार असणारी वाडी आहे. प्रभाग 19 मध्ये झालेल्या मतदानापैकी 486 मते आमदार नितेश राणे यांना तर नाममात्र 87 मते पराभूत उमेदवार पारकर यांना मिळाली आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रभाग 19 मध्ये मिळलेल्या 486 मतांपैकी 360 मते हि केवळ नरगोलवाडीमधून मिळाली आहेत. आमदार राणेंची कार्यपद्धती, तसेच वाडीमध्ये झालेली आणि येत्या काळात होऊ घातलेल्या विकासकामांबाबतची विश्वासाहर्तता आणि पोचपावती नरगोलवाडीतील सर्व मतदारांनी आमदार नितेश राणे यांना या मताधिक्यातून दिल्याचे दिसून येते. नरगोलवाडीतील सामाजिक कार्यकर्ते आणि पडेल तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वैभव वारीक, विकास सोसायटीचे मा. व्हाईस चेअरमन संतोष माश्ये, प्रकाश वारीक, राजेश वाडेकर, प्रभाकर वाडेकर, तसेच वाडीतील सर्व मतदार ग्रामस्थ, महिला आणि युवक यांच्या सुयोग्य नियोजनामुळे प्रभावशाली मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते.