बाहेरून येऊन घाणेरडे राजकारण करतायत

नितेश राणेंचा सतेज पाटलांवर निशाणा
Edited by: साहिल बागवे
Published on: August 27, 2024 15:32 PM
views 70  views

कणकवली : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत मालवणमध्ये घडलेली दुर्घटना दुर्दैवी होती. प्रत्येक शिवप्रेमीला दु:खदायक अशी अवस्था होती. शिवरायांच्या पुतळ्याची झालेली दुरवस्था पाहण्यासारखी नाही. याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत नौसेनेचे पथक ही मालवणमध्ये दाखल झाले आहे. ही घटना राजकारण करण्यासारखी नाही आहे. त्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊया आणि जगाला हेवा वाटेल असा छत्रपतींचा पुतळा पुन्हा उभारूया असे आवाहन भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. 

  जगातील प्रत्येक शिवप्रेमी छत्रपतींवर प्रेम करणारा आहे. जगात कुणाच्याही मनात छत्रपतींच्या पुतळा पडून अशी दुर्घटना घडावी असे जराही येणार नाही. पंतप्रधान मोदी नेव्ही डे निमित्ताने मालवण मध्ये आले होते. त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. प्रत्येकाने नेव्ही डे कार्यक्रमात आपले योगदान दिले आहे. 

ही घटना राजकीय नाही. त्या घटनेच राजकारण करन चुकीचं आहे.आपल्याला शिवरायांसाचे मावळे म्हणून जगायला मिळाल आहे.जगाच्या पाठीवर असा कोणी नाही ज्याच्या मनात अशी घटना होउदे असं इच्छा बाळगेलं त्यामुळे कोणालाही दोषी ठरवन हे चुकीचं आहे.प्रत्येकाने आपलं प्रामाणिक पद्धतीने योगदान दिल आहे. निलेश राणे बोलल्याप्रमाणे ते सर्वांच्या संपर्कात आहेत. जगाला हेवा वाटेल असा पुतळा तिथे लवकरच उभा राहील.

मात्र तेथे घाणेरडे राजकारण सुरु आहे ते आश्चर्य कारक आहे. टीका करणारे बाहेरून येतात पाहणी करतात. टीका करतात.सतेज पाटील यांना शिवरायांबद्धल जर आदर असता तर विशाळ गडावरील अतिक्रमण हटविण्याबाबत  निर्णय घेतले असते.

दुर्दैवाने राजकीय विरोधकांकडून याचे राजकारण केले जात आहे.सतेज पाटील मालवण मध्ये येऊन छत्रपतींच्या प्रेमाबाबत उपदेश करतात. पण त्यांच्या जिल्ह्यात विशाळगडवर केलेलं अतिक्रमण पाटील यांना दिसत नाही. गड किल्ल्यावर हिरव्या चादरी घातल्या जातायत त्यावर महाविकास आघाडीचे कोणीही नेते अवाक्षर काढत नाहीत. मालवणात येऊन शिव पुतळ्याबाबत बोलून घाणेरडे राजकारण करताना स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यातील महाराजांच्या गड किल्ल्यावरील अतिक्रमण बाबत अवाक्षर न काढणाऱ्या सतेज पाटील यांनी आवाज उठवला असता त्यांचे शिवप्रेम दिसून आले असते. माजी खासदार निलेश राणे प्रशासन आणि शासनाशी समन्वय साधून आहेत. पूर्वीपेक्षा भव्यदिव्य आणि मजबूत दर्जेदार असा शिवरायांचा पुतळा महायुती सरकार बनवणार आहे.

उबाठा सेनेचे अतुल रावराणे आणि काहीजण पिडबल्युडी ऑफिसबाहेर आंदोलन करताहेत. कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज दुग्धाभिषेक करत आहेत. मात्र याच चौकात हायवेवर मध्यभागी शिवरायांचा हाच  पुतळा उभा होता. एकाधी दुर्घटना घडण्याआधी तो पुतळा आम्ही सन्मानाने सुरक्षित जागेवर हलवला. आता याच पुतल्यावर दुग्धाभिषेक करणारे तेव्हा कोठे होते ? पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः पोलीस ठाण्यात बसून दोषींवर गुन्हा दाखल करायला सांगितले आहे. संजय राऊत उद्या जरी नळाला पाणी आले नाही तरी मंत्र्यांचा राजीनामा मागतील. खिचडी चोरी सारख्या गुन्ह्यातील संजय राऊत यांनी दुसऱ्यांचे राजीनामे मागू नये असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी लगावला.