
देवगड : कुणकेश्वर येथील दीपोत्सव कार्यक्रमालाभेट देऊन आ.नीतेश राणे यांनी कुणकेश्वर चे दर्शन घेतले याप्रसंगी देवस्थानाचे नूतन अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते आ. नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आल. या कार्यक्रमाला देवस्थानाचे नूतन अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश ताम्हणकर, भाजप पदाधिकारी संदीप साटम,बाळा खडपे,दया पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आ.नितेश राणे कुणकेश्वर चरणी लीन झाले. यावेळी कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडीभोवती दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती.दिव्यांच्या या अप्रतिम प्रकाशामुळे संपूर्ण मंदिर परिसर लख्खं उजळून निघाला होता.