ठाकरेंनी केसरकर बोलतात ते खोट आहे हे सिद्ध करावं

नितेश राणेंचं आव्हान
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 07, 2024 07:46 AM
views 377  views

कणकवली : दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडत असल्याने ठाकरे कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली आहे. दिशा सालीयन प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना दोन वेळा फोन करतात तर मोदीं साहेबांजवळ गेले असतीलच. मंत्री दीपक केसरकर जे बोलत आहेत ते खोट असेल तर आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व सिडीआर रिपोर्ट दाखवावेत म्हणजे कोण खरे आणि कोण खोटे आहेत ते कळेल. आता ठाकरेंनी स्वतःला खरे करून दाखविण्याची वेळ आली आहे, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते 

अमित शहा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर टीका करण्याची हिम्मत संजय राऊत ने करू नये. 370 हटविण्याचा काय फायदा झाला हे भांडुप मध्ये बसून समजणार नाही. त्यासाठी काश्मीर मध्ये जा.पाक व्याप्त काश्मीर आम्ही घेणारच पण कधी घेणार हे संजय राऊत सारख्या तीनपाट माणसाला का सांगावे ? आम्ही देशाच्या जनतेला सांगू.आता संजय राऊत चे ओझे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी किती वेळ उचलावे? दुसऱ्यांना ओझे बोलण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबावर ओझे झाला आहात ते बघ अशा शब्दात सुनावले. 

    अमित शहा, मोदी साहेब  जेव्हा महाराष्ट्र राज्यात येतात ते राज्याला काही तरी देण्यासाठी. तुझ्या सारखी गद्दारी करण्यासाठी नाही. 370 ला पाठिंबा दिला नसता तर तुझ्या मालकाला लोकांनी मातोश्री च्या बाहेर काढून मारला असत म्हणून तुम्ही तेव्हा पाठींबा दिला. काय दिवे लावले हे बघायचे असेल तर दिवा घे आणि काश्मीर ला जा तिकडे ध्वज फडकतो आहे तो मोदी आणि शहा यांच्यामुळे ते पहा. जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल तेव्हा राऊत मोदी, शहा यांचे अभिनंदन  करेल. जेव्हा तुझ्या ढुंगणावर पवार ठाकरे लाथ मारतील तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करू असेही सुनावले.

    प्रकाश आंबेडकर तुमच्या बाजूने किती उभे आहेत. हे येणाऱ्या दिवसात समजेल लवकरच चित्रपट प्रदर्शित होईल. ईव्हीएम बाजूला केल्यानंतर अबू आजमी चा एक तरी उमेदवार निवडून येईल का ? त्याच्या घरातील एक तरी मत मिळेल का? मी फायरब्रॅंड नेता असल्याचे उबाठा आमदार वैभव नाईक म्हणत आहेत, त्यांनी ते स्वीकारले आहे. तर त्यांच्या पक्षातून माझ्या मतदारसंघात इच्छुक असलेल्या तीन तीन उमेदवारांना याबाबतची माहिती द्यावी.   

संसद म्हणजे देशाच्या विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. फिज्झा बर्गर चे विषय नाही. विनायक राऊत हा राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत. लवकरच राजकीय राम नाम होईल. खंबाटा मध्ये चोरी केलेलं धन असेल त्या बद्दल ते बोलत आहेत. जनशक्ती ही भारतीय जनता पक्षासोबत आहे. देशाच्या भूमीत निवडून येऊन देशाची गद्धारी करावी यालाच इम्तियाज जलाल म्हणतात.अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.