नितेश राणेंनी मंत्रीपदाची शपथ घेताच निलेश राणेंचा ठाकरेंवर 'प्रहार'

Edited by: ब्युरो
Published on: December 16, 2024 10:50 AM
views 441  views

सिंधुदुर्ग : फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला. आमदार नितेश राणे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हा शपथविधी होताच आमदार आणि नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. नितेश राणे यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याचे फोटो शेअर करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली. यावेळी ते काय म्हणालेत पाहूयात....


काय आहे निलेश राणेंची पोस्ट ?


श्री. उद्धव ठाकरे, तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली. राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा... आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल. जय महाराष्ट्र!