नितेश राणेंच्यावतीने पोलीसांना रेनकोट वाटप

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 22, 2023 15:57 PM
views 293  views

वैभववाडी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी पोलीसांना रेनकोट वाटप केले. वैभववाडी पोलीस स्थानकात हा रेनकोट वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे,माजी जि.प.सदस्यसुधीर नकाशे,  नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे महीला तालुका अध्यक्ष प्राची तावडे, माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर, माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे, नगरसेवक रोहन रावराणे, संताजी रावराणे , प्रकाश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.