
देवगड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देवगड सज्ज झाले असून नववर्षाचे स्वागत 31 डिसेंबर चा जल्लोष साजरा करण्यासाठी आजपासून देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था आयोजित देवगड बीच फेस्टिवलचे आयोजन आज व उद्या ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वा. होणार आहे.
३१ डिसेंबर रोजी सायं. ७ वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम रात्री ९ वाजता : जल्लोष २०२५ पार्श्वगायिका अक्षता सावंत संगीतकार आणि गायक स्वप्निल गोडबोले गायक रविंद्र खोमणे, दूर नवा ध्यास नवा उपविजेता गायक सचाच त्यासोबत सिंधु संकल्प, कुडाळचे डान्स परफॉर्मन्स, रात्री १२ वाजता जल्लोषपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये ३० डिसेंबर रोजी सायं, ०७-३० वा. राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते उद्घाटन, सायंकाळी ७.३० वा. स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम, रात्री ९. वा. बेधुंद गायक- संज्योती जगदाळे, सूर नवा ध्यास नया उपविजेती समृद्ध चोडणकर, गोवा आयडॉल विभा अलगुंडगी, व्हाईस ऑफ गोवा विनर सोबत सिंयु संकल्प, कुडाळचे डान्ना परफॉर्मन्स असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख अतिथी नगराध्यक्षा साक्षी प्रभू,परीक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा तहसिलदार लक्ष्मण कसेकर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बंदर अधिकारी साहेबराव आवळे, न. पं. सुरज कांबळे, उद्योजक प्रकाश गायकवाड, ग्रीष्मा सोलरचे अशोक मजुमले, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम,अण्णा घेवारी उपस्थित राहणार आहेत.