दोडामार्ग तालुक्यात आज महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका

पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन ठिकाणी सभा
Edited by:
Published on: February 04, 2026 10:35 AM
views 66  views

दोडामार्ग : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात महायुतीकडून प्रचाराला वेग आला असून आज बुधवारी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

या सभांना नितेशजी राणे साहेब, पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, तसेच आमदार दीपक केसरकर यांसह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी साहेब, जिल्हाप्रमुख संजू परब आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी ३ वाजता मणेरी मतदार संघात श्री. गणेश मंगल कार्यालय सासोली, संध्याकाळी ४ वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय झरेबांबर व ५ वाजता श्री. गणराज कलामंच साटेली भेडशी येथे या महायुतीच्या प्रचारार्थ सभा होणार आहेत. तरी महायुतीचे सर्व उमेदवार,पदाधिकारी यांनी वेळेत सभेस उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व भाजपा तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी केले आहे.