
कणकवली : युवासेनेने आमदार राणेंना विचारलेल्या 10 प्रश्नांची पत्रक फोंडाघाट बाजारपेठेत वाटण्यात आली. संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच चर्चा आहे, ती म्हणजे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेने प्रसिद्ध केलेल्या त्या पत्रकाची. जनतेच्या मनातील प्रश्न या पत्रकाद्वारे आमदार नितेश राणेंना विचारण्यात आले आहेत अशी भावना संपुर्ण मतदार संघातील सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. अजून काही समस्या, काही प्रश्न आहेत अशी ही भावना जनतेकडून येत आहे.
फोंडाघाट बाजारा दिवशीच ही पत्रक युवासेनेनी वाटली. त्यामुळे पंचक्रोशीतील वाघेरी, हरकुळ खुर्द, घोणसरी, लोरे या परिसरातील नागरिकांना देखील पत्रक वाटण्यात आली. यावेळी नागरिकांमधून चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चांगले प्रश्न युवासेनेने मांडले, अजूनही काही समस्या आहेत त्या देखील तुम्ही मांडाव्या अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना उपजिल्हाप्रमुख आबू साहेब पटेल, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, फोंडा विभागप्रमुख सिद्धेश राणे, महिला उपतालुकाप्रमुख संजना कोलते, फोंडा शहरप्रमुख श्री. पाटकर, सुरेश टक्के, श्याम भोवड, अनिल पटेल, घोणसरी शाखाप्रमुख कृष्णा एकावडे, भाई राणे, संदीप मेस्त्री, युवासेना शहरप्रमुख बंटी उरणकर, साई भोवड, वाघेरी शाखाअधिकारी पंकज रावराणे, लोरे शाखाअधिकारी निलेश रावराणे, सिद्धेश रावराणे, मच्छिंद्र रावराणे, जितेश परब आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.