
सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ना. नितेश राणे यांचा नियोजित दौरा खालीलप्रमाणे...
गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.१५ वा. अधिश निवासस्थान, जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण, सकाळी ११.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन व राखीव, दुपारी १२.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून एअर इंडिया विमानाने गोव्याकडे प्रयाण, दुपारी ०१.२५ वा. दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी ०३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व बैठकीस उपस्थिती ( ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ), सायं. ०५.०० वा. भारतीय जनता पक्ष ओरोस कार्यालय, जि. सिंधुदुर्ग येथे पदाधिकाऱ्यांसह बैठकीस उपस्थिती ( ठिकाण : भारतीय जनता पक्ष कार्यालय, ओरोस ) असा त्यांचा दौरा असणार आहे.