
कणकवली : पालकमंत्री नितेश राणे व ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतिश सावंत कनेडी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते.कमेकांविरोधात विधानसभा निवडणुक लढलेले दोन्ही नेते तब्बल सहा वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसले आहेत.यावेळी दोघांमध्येही संभाषण झाले असून हास्यविनोद झाले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा भुकंप होणार की काय याची चर्चा रंगू लागली आहे.