सरकार पातळीवर कामगारांचे प्रश्न सोडविणार : मंत्री नितेश राणे

Edited by:
Published on: May 18, 2025 17:37 PM
views 77  views

कणकवली : सरकारच्या माध्यमातून आज आपण सगळेजण एकत्र आलेलो आहेत. भारतीय कामगार संघटना आणि कामगार सदस्याला प्रत्येकाला मजबूत करण्यासाठी तुम्हा सर्व बांधकाम कामगार महासंघाच्या  पाठीशी आम्ही आहेत.तुमच्या मुळेच आम्ही सत्तेत आलोत. सरकार पातळीवरील सर्व योजना तुमच्या पर्यंत पोचविणार .मी तुमचाच माणूस आहे. जिथे अडचण असेल तेथे मला हाक द्या. फोन करा. मी तुमचा  हक्काचा माणूस आहे. असा विश्वास मत्स्य व मंत्री विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.

भारतीय मजदूर संघाच्या,बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेश चे ४ थे वार्षिक प्रदेश अधिवेशन कणकवली येथे आयोजीत करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, भारतीय मजदूर संघ प्रदेश अनिल ढुमणे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगिरी, प्रदेशाध्यक्ष हरी चव्हाण, प्रदेश संघटन मंत्री उमेश महाडिक, प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे, जिल्हाध्यक्ष भगवान साटम, जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

मंत्री नितेश राणे म्हणाले,कोणाही अधिकारी किंवा व्यक्ती तुम्हाला कामगारांची फसवणूक करत असेल तर कोणाला सोडणार नाही. तुम्ही फक्त माहिती द्या. तुमच्या सारख्या सामान्य कामगारांना फसविताना कोण दिसला तर पुन्हा तो त्या पदावर असणार नाही.असा इशाराही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिला. यावेळी कामगारांना विश्वास  देताना मंत्री नितेश राणे म्हणाले,सरकार पातळीवर कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही माझ्याकडे या. मी सोडविणार. असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दिला.