
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी दिले. कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली व आपल्या मागण्या आणि अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या त्यावेळी 'काळजी करू नका कोणावरही अन्याय होऊ देणार नाही' असे आश्वासन दिले.
महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथे सुरू झाल्यापासून ५२ कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांचे कंत्राट वेगवेगळ्या चार कंपन्यांना देण्यात आलेले आहे. मात्र, चारही कंपन्यांकडून महिना पगार मिळत नाही. याबाबतची कैफियत मंत्री नितेश राणे यांच्यासमोर मांडली. यावेळी कर्मचारी युगंधर तेंडुलकर, गौरेश केळुस्कर, रोशनाली परब,अभिनय गावडे ,वैशाली चव्हाण, श्रमिका मस्के,अस्मिता सावंत, श्रद्धा सावंत, सोनाली कविटकर, पूजा परब, मीनाक्षी पाटकर, प्रियंका ठाकूर,समीक्षा सांगळे, रवीना गुरव, मयुरी शिंदे, दिशा देसाई, शैलेश मयेकर,निशा मराठे, नितीन जाधव,पूजा मेस्त्री, नंदिनी सिंगनाथ प्रतिभा मसुरकर, गौरेश गुरव, कोमल गोठणकर अनन्या बावलेकर, रेश्मा सावंत, जानवी गंगावणे,सागर सावंत,योगेश धुरी, दर्शना बावलेकर,रेणुका ठाकूर,नंदिनी पांगुळ, जितेंद्र गोसावी, श्रद्धा गावकर,दिव्यात ठाकूर, शितल पारकर,प्रसाद जाधव, तृप्ती परब, परेश कोटकर,अमिता पावसकर, रामचंद्र दळवी,आदी उपस्थितीत होते.