
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनापूर्वी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळाचा विस्तार झाला. यामध्ये आमदार नितेश राणेंची कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. या निवडीनंतर राज्यभरातून त्यांचं कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवर चेअरमन दत्तात्रय पानसरे, व्हा.चेअरमन रोहित निकम, संचालक प्रमोद रावराणे (सिंधुदुर्ग), अतुल गण्यारपवार (गडचिरोली), पांडुरंग घुगे (छ. संभाजी नगर), बळवंत पाटील (नांदेड), नितिन हिवसे (अमरावती), रमेश हिंगणकर (अकोला), आबासाहेब पाटील ( लातुर), संजय पवार ( जळगांव), सुभाष रघाताटे (चंद्रपुर), राहूल काकडे (पुणे), अशोक हटकर (बुलढाणा), धनश्री घाटगे (कोल्हापुर), अयोध्या धस (धाराशिव), संदिप नरके (कोल्हापुर), सुनिल चव्हाण (धाराशिव) आदी उपस्थित होते. मंत्री राणे यांनी महासंघाला सरकारच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.