नितेश राणेंच्या नवनिर्वाचित विषय समिती सभापतींना शुभेच्छा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 12, 2024 15:12 PM
views 241  views

देवगड : आम.नितेश राणेंनी देवगड - जामसंडे नगरपंचायतच्या नवनिर्वाचित विषय समिती सभापती यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य बाळा खडपे, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष योगेश पाटकर, पंकज दुखंडे, मिलिंद माने, यश रानडे आदी उपस्थित होते.

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम सभापती पदावर नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, आरोग्य सभापती आद्या गुमास्ते, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती प्रणाली माने, महिला बालकल्याण उपसभापती रूचाली पाटकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे आम.नितेश राणे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.