
देवगड : देवगड तालुक्यातील भजनी कलावंतांनी आमदार नितेश राणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. येणारे सरकार हे महायुतीचेच असेल आणि भजनी कलावंतांना अनेक सुविधा आपण मिळवून देणार आहोत. भजन कला ही वृद्धिगत व्हायला हवी कारण भजन हे लोकप्रबोधनाचे फार मोठे माध्यम आहे, असे मत आ. नितेश राणे यांनी या वेळी व्यक्त केले आहे.यावेळी भाजपा पदाधिकारी रवी तीरलोटकर व अन्य भागातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
महायुती सरकारने कलावंत, वृद्ध नागरिक अशा अनेक घटकांची योग्य काळजी घेतली व त्यांना सुविधा दिल्या. भजनी कलावंतांसाठी आपण नक्की प्रयत्न करू असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले आहे. पाठिंबा देणाऱ्या भजनी कलावंतांमध्ये बुवा अजित मुळम, बुवा विनोद सुके, बुवा अजित मुळम, बुवा रविंद्र धावरे व अनेक शिष्यगण या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.