कुरंगवणे कुडाळकरवाडीत नितेश राणेंचा ठाकरे सेनेला दणका

Edited by:
Published on: November 16, 2024 15:30 PM
views 196  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठा ला चांगला दणका दिला. उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सारिका कुडाळकर, बाबू गोठणकर, चंद्रकांत कुडाळकर, अरुण नरम, मोतीराम भितम, गणपत कुडाळकर पांडुरंग कुडाळकर सुप्रिया कुडाळकर, आकाराम रायकर, संजय कुडाळकर संतोष कुडाळकर, सूर्यकांत कुडाळकर, संतोष पाष्टे, दीपक भितम, अभिजीत भितम, शंकर मांडवकर, गणपत भितम, दीपक कुडाळकर, सदाशिव कुडाळकर, रवींद्र नराम, अर्जुन कुडाळकर, मनोहर कुडाळकर, एकनाथ गोठणकर यांचा भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. 

आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिपणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्वल भवितव्य आहे असे मत प्रवेश करते आणि व्यक्त केले. यावेळी दिलीप तळेकर, बाळा जठार, सरपंच पप्पू ब्रह्मदंडे, बबलू पवार, राजा जाधव आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.