
देवगड : देवगड तळेबाजार येथे आ.नितेश राणे यांच्या प्रचारार्थ गुरुवार आठवडा बाजारा दिवशी तळेबाजार बाजारपेठेत प्रचार फेरी काढण्यात आली होती.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, देवगड मंडल अध्यक्ष राजेंद्र शेट्ये ,भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित साटम,पंकज दुखंडे, पूजा दुखंडे, श्वेता शिवलकर, सुधीर म्हापसेकर, अमित कदम , मंगेश लोके, संतोष कुमार फाटक, सुभाष नार्वेकर, महेश पाटोळे, सदानंद देसाई, अजित कांबळे, शैलेंद्र जाधव, सत्यवान सावंत, किशोर साळसकर, महेद्र परब, सुभाष कदम, पप्पू घाडी, सुहास परब, सुनील कांडर, तळवडे सरपंच गोपाळ रुमडे, महेश पवार, हडपीड सरपंच संध्या राणे, गा.प सदस्य स्वाती साटम, शितल तावडे, धनश्री नाईक, अपुर्वा तावडे, तसेच तळेबाजार पंचक्रोशीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
'आ. नितेश राणे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है"भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशा घोषणा देत प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद लाभला.