
वैभववाडी : तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे.जी उर्वरित कामे राहिली आहेत ती नवं सरकार आल्यावर आपण मार्गी लावणार आहोत.तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी तुमचं आशीर्वाद रुपी मत मला द्या असं आवाहन महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी व्यापारी बांधवांना केले.
कोकिसरे येथील महालक्ष्मी हॉलमध्ये वैभववाडी तालुक्यातील व्यापारी बांधवांची बैठक पार पडली.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ व्यापारी शांताराम काका रावराणे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आंबेकर, माजी अध्यक्ष मनोज सावंत, श्री घोणे मामा उपस्थित होते. यावेळी आ. नितेश राणे यांनी जेष्ठ व्यापा-यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी भाषणात ते म्हणाले,शहराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही माझी आहे. उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत सर्व व्यापाऱ्यांनी मला मतदान करून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन केले.
यावेळीतसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, भालचंद्र साठे, प्राची तावडे, मंगेश गुरव, नेहा माईणकर, संजय सावंत, डॉ. राजेंद्र पाताडे , बबलू रावराणे, हुसेन लांजेकर उद्योजक विजय तावडे , व्यापारी संतोष कुडाळकर, सुरेंद्र नारकर, तुकाराम प्रभू, नितीन कदम, मनोज मानकर, दिलीप मोरे, मनोहर फोंडके, मंगेश चव्हाण, संजय साळसकर, नितीन महाडिक, रत्नाकर कदम, रवींद्र पाटील, संतोष कोलते, सुनील कुंभार, गणेश भोवड, शेखर नारकर, गंगाधर केळकर, सत्यवान पाटील, श्री प्रभूलकर, श्री कुबडे, गणेश मोहिते, तुकाराम देवासी, प्रल्हादसिंग, बंड्या गाड, बाळा पारकर, श्री .हवालदार, व अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.