नितेश राणेंच्या उपस्थितीत पोयरेचे माजी सरपंच भाजपात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 06, 2024 17:46 PM
views 139  views

देवगड :  देवगड तालुक्यातील पोयरे गावचे माजी सरपंच प्रशांत पाटील व उबाठा सेनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत भाजपा पदाधिकारी बाळा खडपे, राजू शेट्टे, सदा ओगले, संदीप साटम, सावी लोके आदी उपस्थित होते. 

उबाठा सेनेचे पदाधिकारी हे केवळ निवडणुकीपुरतीच येतात विकासासाठी कायम लोकसंपर्क असलेले आ. नितेश राणे हेच नेते आहेत. असे मत प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केले आहे. प्रवेश करणाऱ्या व्यक्तींमध्ये गुरूनाथ पेडणेकर, सूर्यकांत पवार, विजय राणे, मनोज जाधव,वामन राणे, वैशाली राणे, प्रियांका पाटील, माधुरी राणे, सुलभा सावंत छाया पवार, रोहन राणे, प्रतिभा पाटील यांनी आ.नीतेश राणे यांच्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन हा पक्ष प्रवेश करत असल्याचे प्रवेश करताना सांगितले.