विजयदुर्ग मुख्य - रामेश्वर घरीवाडी रस्त्याचं भूमिपूजन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 09, 2024 14:59 PM
views 248  views

देवगड : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग येथील विजयदुर्ग मुख्य रस्ता ते रामेश्वर घरीवाडी हा रस्ता या मार्गाचे विजयदुर्ग रोड ते विजयदुर्ग जेटी धुळपघाटी मार्गे रामेश्वर धर्मशाळा घरीवाडी रस्ता या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

 यावेळी  बाळा खडपे, पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी जि.प. सभापती संजय बोंबडी, माजी पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, माजी प.स. सदस्य शुभा कदम, महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे,उपसरपंच विजयदुर्ग रियाज काझी, माजी सरपंच प्रसाद देवधर, रामेश्वर सरपंच मोनिका ठूकरूल, गिर्ये सरपंच लता गिरकर, तिर्लोट सरपंच सौ. जुवाटकर, माजी उपसभापती नसीर मुकादम, माजी सरपंच रामेश्वर विनोद सुके, सौंदाळे सरपंच मनाली कामतेकर, महेश बिडये, प्रकाश पुजारे, ग्रेसीस फर्नांडिस, तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी, नेते, बूथ अध्यक्ष, व दशक्रोशीतील ग्रामस्थ  उपस्थित होते.

मोहिमेमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत हा रस्ता बांधण्यात आला होता. यानंतर हा रस्ता सुधारण्यासाठी व डांबरीकरणासाठी आमदार नितेश राणे यांनी निधी दिला आहे.रोजगार हमीतून रस्ता बनवणारे तत्कालीन ठेकेदार आता हयात नाही मात्र त्यांचा मुलगा आदम याचा सत्कार यावेळी करण्यात आला. आमदार नितेश राणे यांनी श्रीफळ वाढवून रस्त्याचे भूमिपूजन केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद देवधर यांनी केले.