आरक्षण बचाव मोर्चाचा अजित कांबळे यांनी घेतला आढावा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 03, 2024 11:49 AM
views 45  views

देवगड :देवगड येथे कणकवलीत होणाऱ्या आरक्षण बचाव मोर्चा नियोजना विषयीचा या मोर्चाचा देवगड तालुक्याचा नियोजन आढावा पडेल मंडळ कार्यालयात अजित कांबळे यांनी दोन्ही मंडळाचे अध्यक्षांच्या उपस्थितीत सविस्तर घेतला. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन देखील यावेळी त्यांच्या कडून करण्यात आले.यावेळी देवगड मंडळ अध्यक्ष देवदत्त कदम आणि पडेल मंडळ अध्यक्ष विश्वनाथ पडेलकर यांनी कार्यकर्त्यांसह आपापल्या मंडळातील वाडीवस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून आणि  केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

यावेळी अनिल पुरळकर, शैलेंद्र जाधव, पि.के. चौकेकर, दीपक कांबळे, इ. कार्यकर्ते व आमदार स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते. आ.नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 5 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.00 वा. कणकवली येथे होणाऱ्या भव्य  आरक्षण बचाव मोर्चा नियोजना विषयी मोर्चाचे देवगडतालुक्याचा नियोजन आढावा पडेल मंडळ कार्यालयात अजित कांबळे यांनी दोन्ही मंडळाचे अध्यक्षांच्या उपस्थितीत सविस्तर घेतला आहे.