
देवगड : देवगड तालुक्यात मुसळधार पावसात अनेक आपदग्रस्त कुटुंबांना नुकसानीचा फटका बसला अशा तिर्लोट परिसरातील चार कुटुंबांना आम. नितेश राणे यांचे मार्फत सिमेंट पत्रांचे वाटप करण्यात आले. सरपंच रितिका जुवाटकर यांच्या प्रयत्नाने ही मदत आम.नितेश राणे यांच्या मार्फत करण्यात आली.
आपतग्रस्त कुटुंब मध्ये दीनानाथ भानू घाडी, हरिहर जयराम घाडी, अमित अंकुश घाडी, उज्वला एकनाथ घाडी यांचा समावेश असून या वितरण प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष डॉ.अमोल तेली, माजी सभापती रवींद्र पाळेकर, सरपंच रितिका रामकृष्ण जुवाटकर, भाजप सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, आरिफ बगदादी, संजय बोबडी, उत्तम बिर्जे, ग्रा प सदस्य कलपेश घाडी कलपिता घाडी, दिनकर घाडी, विजय घाडी, अजित घाडी, विशाल घाडी, योगेश राघव उपस्थित होते.