नितेश राणेंच जयेंद्र रावराणे यांनी केले अभिष्टचिंतन

पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2024 14:28 PM
views 113  views

वैभववाडी : आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त जि.प चे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी कणकवली येथील निवासस्थानी जाऊन आम.राणेंना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 आ. नितेश राणेंचा आज वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.आम.राणे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी होते.सकाळपासूनच जिल्ह्यासहीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत.त्यांच्या या वाढदिवसानिमित्त माजी सभापती जयेंद्र रावराणे यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन आ.राणेंच अभिष्टचिंतन केले.यावेळी नगरसेवक रोहन रावराणे,शिक्षक नेते शरद नारकर,उदय पांचाळ आदी उपस्थित होते.