डावखरेंच्या विजयाचं विशाल परबांनी केलं सेलिब्रेशन !

Edited by: विनायक गांवस
Published on: July 03, 2024 06:48 AM
views 122  views

सावंतवाडी : कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या एकतर्फी विजयानंतर भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून व मिठाई वाटप करत जल्लोष करण्यात आला. भाजपने कोकणात बाजी मारली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांत देखील आम्हीच जिंकू असा विश्वास विशाल परब यांनी यावेळी व्यक्त केला.

निरंजन डावखरे यांचा एकतर्फी विजय झाल्याबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आपल्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत व मिठाई भरून विजय उत्सव साजरा केला. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन काम केल्याने आ. डावखरे यांचा विजय एकतर्फी होऊ शकला. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार मानतो असे ते म्हणाले. 

यावेळी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, उमाकांत वारंग, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, अमित परब,,  अमित गवंडळकर, नागेश जगताप, परेश बांदेकर, पुंडलिक कदम आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.