भाजपाच्या विजयी उमेदवारांचं निल्रेश राणेंनी केलं अभिनंदन..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 06, 2023 17:46 PM
views 168  views

मालवण : कुडाळ, मालवण तालुक्यातील ७ पैकी ४ ग्रामपंचायतवर भाजपा शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर भाजपचे कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख तथा माजी खासदार निलेश राणे यांनी विजयी सरपंच आणि सदस्यांसह निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. भाजपा शिवसेना युतीच्या ग्रामपंचायती निवडून आल्या, त्या बद्दल निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन. १ अपक्ष ग्रामपंचायत निवडून आली, ऊबाठा गटाच्या फक्त दोन ग्रामपंचायत थोड्या फरकाने निवडून आल्या असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.