
मालवण : कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर आर्थिक परिस्थिती काहीशी खालावल्याने मुंबई येथील नितीन गावकर कुटुंबीय शालेय शिक्षण घेत असलेल्या मुलगी युथिका हिला घेऊन वायरी लुडबे वाडी येथील आपल्या गावी काही महिन्यांपूर्वी आले. शालेय फी संदर्भात काही समस्या असल्याने युथिका हिचे लिव्हिंग सर्टिफिकीट मिळत नव्हते. याबाबत शाळा व तेथील लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क करूनही कोणताही मार्ग निघत नव्हता. लिव्हिंग सर्टिफिकीट नसल्याने मालवण येथील शाळेतही युथिका हिला प्रवेश मिळत नव्हता.
या प्रश्नी माजी नगरसेविका पूजा करलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सौ. साक्षी जुवाटकर यांनी भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. निलेश राणे यांनी तात्काळ मुंबई येथील संबंधित शाळा व्यवस्थापनाशी चर्चा करून शालेय प्रक्रिया पूर्ण करून घेत युथिका गावकर हिचे लिव्हिंग सर्टिफिकीट अवघ्या एका दिवसात मिळवून दिले. याबाबत युथिका हिच्या पालकांनी बुधवारी निलेश राणे यांची मालवण येथील निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले आहेत. यावेळी पूजा करलकर, बाबा परब आदी उपस्थित होते.
भाजपच्या माध्यमातून मिळणारी तत्पर सेवा व नेहमीच सामाजिक भान जपणारे निलेश राणेंसारखे नेतृत्व याचा प्रत्यय या निमित्ताने पुनः एकदा अनुभवता आला. अशी भावना पूजा करलकर यांनी व्यक्त केली.