कुशेवाड्यात निलेश सामंतच किंगमेकर

ग्रामपंचायतवर भाजपची एकहाती सत्ता
Edited by: दीपेश परब
Published on: December 29, 2022 12:51 PM
views 175  views

वेंगुर्ला : तालुक्यातील कुशेवाडा ग्रामपंचायत वर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आणि याचे किंगमेकर ठरले ते सरपंच निलेश दत्तात्रय सामंत. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीत सुद्धा महादेव अनंत सापळे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निलेश सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुशेवाडा ग्रामपंचायतने आतापर्यंत स्वच्छतेसह स्मार्ट ग्राम असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.

भाजपचे तालुका उपाध्यक्ष असलेले निलेश सामंत यांनी यापूर्वी २००७ ते २०१२ पर्यंत कुशेवाडा उपसरपंच म्हणून काम पाहिले यावेळी त्यांच्या पॅनलचे ग्रामपंचायतवर 9 पैकी 7 सदस्य विजयी झाले होते. यानंतर २०१२ ते २०१७ साली त्यांनी कुशेवाडा सरपंच म्हणून काम पाहिले यावेळी त्यांच्या पॅनलचे 9 पैकी 9 सदस्य विजयी झाले होते. २०१७ ते २०२२ साली त्यांनी पुन्हा कुशेवाडा उपसरपंच म्हणून काम पाहिले यावेळी त्यांच्या पॅनलचे सरपंच व 9 पैकी 7 सदस्य विजयी झाले होते. यानंतर नुकत्याच झालेल्या आदिनारायण विकास सोसायटी परुळे मध्ये त्यांनी १३ पैकी १३ संचालक निवडून आणत चेअरमनपदी ते विराजमान आहेत. तर आता थेट सरपंच निवडित सुद्धा त्यानी विजय मिळवत भाजपच्या पॅनलचे 9 पैकी 8 सदस्य विजयी झाले आहेत.