निलेश राणेंचं झारापमध्ये जंगी स्वागत !

ताफ्यात शेकडो गाड्यांचा सहभाग
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 17:27 PM
views 716  views

कुडाळ : भाजप नेते निलेश राणे यांचं आज जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत झाराप येथे जंगी स्वागत केले. माजी खासदार निलेश राणे यांनी विजयादशमी दिवशी सोशल माध्यमावर व्यक्त होत राजकीय संन्यास जाहीर केला होता. 

मात्र त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे. त्यानंतर माजी खासदार निलेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत धाराप झिरो पॉईंट येथे निलेश राणे यांचा जंगी स्वागत केलं यावेळी निलेश राणे यांच्या तर्फे शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाड्या सहभागी झाल्या आहेत.