निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश

मालवणातील प्रमुख रस्त्यांच्या कामावरील स्थगिती उठविली
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 19, 2023 15:46 PM
views 435  views

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार  निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने मालवण-कसाल व वायरी-तारकर्ली-देवबाग या मुख्य रस्ता मार्गांवरील सुधारणा व डांबरीकरण कामांवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे कोट्यावधी निधीतील रस्ते विकासकामे मार्गी लागणार आहेत.

राज्यात भाजप युती सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात भाजप कुडाळ मालवण विधनासभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुरव्यातुन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. कसाल-मालवण व वायरी-तारकर्ली-देवबाग या प्रमुख रस्ता कामांवर असलेली स्थगिती उठण्या बाबत निलेश राणे यांचा गेले काही दिवस सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता.

कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या महत्वपूर्ण असलेल्या कसाल-मालवण रस्त्याच्या १ कोटी ८० लाख तर पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वायरी तारकर्ली देवबाग या रस्त्याच्या १ कोटी ९९ लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा केली होती. आता प्रशासनाने या विकासकामांवरील स्थगिती उठल्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघात पुन्हा नव्याने ३ कोटी ८० लक्ष एवढा विकासनिधी उपलब्ध झाला आहे. 

मागील आठवड्यात भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील बजेटच्या एकूण २ कोटी ७० लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत केलेला पाठपुरावा ही यशस्वी ठरला होता.