मालवणात निलेश राणेंचा करिष्मा

भाजपच्या दहा ग्रामपंचायती बिनविरोध ; धोंडी चिंदरकर माजी खासदार निलेश राणे यांनीही केले सहकाऱ्यांचे अभिनंदन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 03, 2022 17:33 PM
views 381  views

मालवण : मालवणमध्ये माजी खासदार निलेश राणे यांचा करिष्मा चालला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मालवणात भाजपाच्या दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत असा दावा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला आहे. या यशानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. 


मालवण तालुक्यातील 55  ग्रामपंचायत निवडणुकांच्या रणधुमाळी सुरु झाली आहे. थेट जनतेतून सरपंच निवड असणाऱ्या या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. तालुक्यातील बांदिवडे, कोईल, पळसंब, काळसे, आंबेरी, कातवड, आनंदव्हाळ, घुमडे, साळेल, आंबडोस, शिरवंडे या ग्रामपंचायतीचे भाजपचे सरपंच बिनविरोध झाल्या आहेत. असा दावा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांनीही भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.