शिवडी - वरळीत निलेश राणेंचा 'मास्टरस्ट्रोक'

११ बंडखोर उमेदवारांची माघार!
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 03, 2026 11:08 AM
views 218  views

मुंबई :  कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी कोकणापाठोपाठ आता मुंबईच्या राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत, निलेश राणे यांनी शिवडी आणि वरळी विधानसभा मतदारसंघांतील तब्बल ११ बंडखोर उमेदवारांची माघार घडवून आणली आहे. राणेंच्या या 'मास्टरस्ट्रोक'मुळे या दोन्ही मतदारसंघांत शिवसेना (शिंदे गट) स्थिती भक्कम झाली आहे.

शिवसेना आणि युवासेना यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वरळी आणि शिवडी मतदारसंघात बंडखोर उमेदवारांमुळे पेच निर्माण झाला होता. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती. राणे यांनी तातडीने सूत्रे हलवत उमेदवारांशी चर्चा केली आणि त्यांचे बंड शमवण्यात यश मिळवले.

माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील :

शिवडी विधानसभा मागे घेतलेले अपक्ष अर्ज.

१. सौ. शलाका पाटील -२०३

२. सौ. तृप्ती गणेश आडवीरेकर -२०३

३. सौ. आकांशा गावडे - २०३

४. सौ. दीप्ती माळकर -२०५

५. श्री. शेखर मोकल - २०६

६. श्री. राहुल यादव - २०६

७. श्री. निलेश राणे - २०२

वरळी विधानसभेतील मागे घेतलेले अपक्ष अर्ज.

१. १९९ सौ. रत्ना महाले

२. १९९ कु. सरसु सेपुरी

३. १९६ सौ. रोहिणी खंडाळे

४. १९३ कु. निकिता घडशी

राणेंचे राजकीय कौशल्य पुन्हा सिद्ध

मालवण नगरपंचायत निवडणुकीत आपल्या नेतृत्वाची झलक दाखवल्यानंतर, आता मुंबईच्या महत्त्वाच्या मतदारसंघांत निलेश राणे यांनी केलेली ही कामगिरी त्यांच्या राजकीय कौशल्याची साक्ष देणारी आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून बंडखोरांशी संवाद साधणे आणि त्यांना विश्वासात घेऊन अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करणे, हे राणेंच्या रणनीतीचे मोठे यश मानले जात आहे.

शिवडी आणि वरळीत बंडखोरी शमल्यामुळे मतांचे होणारे विभाजन आता थांबणार आहे. याचा थेट फायदा अधिकृत उमेदवारांना मिळणार असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निलेश राणे यांच्या या यशस्वी मध्यस्थीची चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगली आहे.