
मालवण : कुडाळ मालवणच्या विकासासाठी कोट्यावधी निधी येत आहे. विधानसभा, मंत्रालय स्तरावरून विकासनिधी प्राप्त होत असताना राणे हे आडनाव असल्यामुळे अधिक सोपे होते. यापुढे मालवण कुडाळ मतदारसंघ सर्वाधिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासह राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी मालवण आंबडोस येथे बोलताना व्यक्त केला.
आंबडोस गावाचे माजी सरपंच तथा उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले.
आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांसह माजी सरपंच दिलीप परब, सरपंच सुबोधिनी परब, माजी सरपंच विष्णू परब, उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दिपक पाटकर, जेष्ठ पदाधिकारी बाळू कुबल, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सचिव राहुल बागवे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, अभि लाड, माजी सरपंच वरवडेकर, नांदरुख सरपंच भाऊ चव्हण, श्याम वाक्कर, धोंडी नाईक, युवासेना विभागप्रमुख विशाल धुरी, पशा नाईक यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जनार्दन नाईक, सुरेश परब, चंद्रकांत परब, सुलोचना राणे, सुधा परब, प्रणाली चव्हाण, पूजा परब, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
आंबडोस गाव हा 1990 पासून नेहमीच राणे साहेबांसोबत राहिला. 100 टक्के मताधिक्य देणारा हा गांव आहे. या गावच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष लक्ष दिले आहे. तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत 25 लाख निधी मंजूर होईल. सोबतच गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. यावेळी बाळू कुबल यांनीही आमदार निलेश राणे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.
आमदार निलेश राणे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीतून विधानसभेत ठसा उमटवला. मतदारसंघातील जनतेला विकासकर्यातून न्याय मिळवून देत आहेत. त्यांच्या कार्य शैलीवर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करतं असल्याचे माजी सरपंच दिलीप परब यांनी सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांचा विशेष उल्लेख दिलीप परब यांनी केला. आम्ही राणे साहेबांचीच माणसे. काही गैरसमजातून राणे कुटुंबापासून दूर होतो. आता पुन्हा एकत्र आलो यांचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
आंबडोस माजी सरपंच दिलीप परब आंबडोस गावातील अनेक उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात विजय नाईक, दीपलक्ष्मी परब, नारायण परब, आनंद साळगावकर, बाबी परब, दिपक नके, दीपिका नके, संजय साळगावकर, अजिंक्य परब, निवृत्ती परब, मारुती परब, रामकृष्ण परब, शैलेश कदम, प्रकाश चव्हाण, सत्यवान साळगावकर, प्रकाश दळवी, दीपक परब, विष्णू साळगावकर, समृद्धी दळवी, सुंदरी चव्हाण, सायली साळगावकर, सुहासिनी दळवी, निकिता परब, रिया इंदुलकर, योजना परब, आरती परब, हरिश्चंद्र परब, हर्षदा परब, अनिकेत करावडे, शांताराम साळगावकर, विश्वनाथ करावडे, दर्शना करावडे, गुरुनाथ परब, दत्ताराम परब, कृष्णाजी करावडे, एकनाथ नाईक, भरत बुठ्ठे, जनार्दन नाईक, विवेक सावंत, अमित राणे, विनायक सावंत, दयानंद पाटकर, मंगेश नाईक, पुजा कदम, प्रणाली चव्हाण, पूर्णानंद कदम, सखाराम नाईक, जयश्री नाईक, राजश्री नाईक, नवनाथ परब, सुलोचना साबाजी परब, साबाजी परब, पुंडलिक परब, दिपक परब, प्रकाश परब, संगीता करावडे, रुपाली परब, ममता नाईक, संदेश परब, विनोद परब, ओंकार परब, राजश्री परब यांसह मोठया संख्येने अन्य ग्रामस्थ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.










