निलेश राणेंनी कार्यकर्त्यांसह 'मन की बात' कार्यक्रम पाहिला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 28, 2024 10:17 AM
views 80  views

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या 112 व्या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. भाजपा नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मालवण भाजपा कार्यालय येथे उपस्थित राहत दूरदर्शनवर हा कार्यक्रम पाहिला. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शहरअध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, अशोक तोडणकर,  आबा हडकर, राजन सरमळकर, पुजा सरकारे, ममता वराडकर, जॉन नरोना, दाजी सावजी, विकी तोरसकर, नारायण धुरी, वसंत गांवकर, दत्तात्रय केळूसकर, राजु बिडये, राकेश सावंत,  निषय पालेकर, ललित चव्हाण, अभय कदम, भाई मांजरेकर, मोहन कुबल यांसह अन्य पदाधिकारी उपस्थितीत होते.