निलेश राणे उद्या सावंतवाडीत | संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 19:52 PM
views 131  views

सावंतवाडी : भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे उद्या सावंतवाडीत येणार आहेत. भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिली आहे. तर शनिवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता संजू परब यांच्या कार्यालयाकडे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.