निलेश राणेंसाठी भाजपचा मेळावा ; जोरदार शक्तीप्रदर्शन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 05, 2024 16:51 PM
views 271  views

मालवण : मालवणात भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून जानकी मंगल कार्यालयात तुफान गर्दी झाली आहे. खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. पालकमंत्री ऑनलाईन मार्गदर्शन करणार असून महायुतीचे उमेदवार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. 


मालवण जानकी मंगल सभागृहात भाजपच्या मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण समन्व्यक बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, रश्मी लुडबे, श्वेता कोरगावकर, सरोज परब, पूजा करलकर, पूजा सरकारे, विलास हडकर, महेश मांजरेकर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित.