निलेश राणेंचा आज शिवसेना प्रवेश

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 23, 2024 05:23 AM
views 178  views

कुडाळ : माजी खासदार निलेश राणे यांचा अधिकृत शिवसेना प्रवेश होणार आहे. सायंकाळी 4 वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हा प्रवेश होतोय. याचवेळी भाजपमधून निलेश राणे यांच्यासोबत कोण जाणार याकडे लक्ष लागलंय. 


भूमिका मांडताना काय म्हणाले होते निलेश राणे ?  

 भाजपात खूप प्रेम मिळालं. भाजपात काम करण्याची शिस्त शिकायला मिळाली. ती जवळून बघितली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लहान भावाप्रमाणे सांभाळल. पक्षात अडचणी आल्यात त्यातून बाहेर काढलं. रवींद्र चव्हाण यांनीही लहान भावाप्रमाणे सांभाळल. भाजपशी जीवाभावाचे संबंध आजही आहेत, कायम राहतील. राजकारणात जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हा पासून नारायण राणेंच्या सावलीमध्ये, ते बोलतील जस बोलतील काहींही प्रश्न न विचारता त्यांच्या बरोबर राहिलो. 23 ऑक्टोबरला उद्या 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्रीमंडळाच्या उपस्थितीत कुडाळ हायस्कूल ग्राउंडवर शिवसेना प्रवेश होईल. 


जेव्हा आपण अलायन्समध्ये असतो. तेव्हा अलायन्सच्या प्रोटोकोलनुसार काम कराव लागत. खासदारकी जिंकलो, ग्रामपंचायत जिंकल्या. खरेदी संघ जिंकलो. यासगळ्या निवडणुका युतीत जिंकलो. आता विधानसभा जिंकू. वरिष्ठांनी ठरवलेल्या या गोष्टी आहेत. राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली ज्या चिन्हावर झाली त्या चिन्हा वरून मी लढणार आहे याचं मला समाधान आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आता काम करायला मिळेल.