निलेश राणेंनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची घेतली भेट..!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 25, 2023 15:34 PM
views 353  views

मुंबई : भाजपचे कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी विधानभवनात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. कुडाळ मालवण तालुक्यातील २५/१५ व पर्यटन संदर्भातील विविध विकास कामांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विकासनिधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिली असे निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.