
मालवण : ईदच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.
देशामध्ये ईद हा सण साजरा केला जातो. ६-७ जून २०२५ रोजी होणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेची तस्करी व कतल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, गोहत्या रोखण्यासाठी राज्यातील पोलिसांना योग्य ते निर्देश देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. गोहत्याबाबत आमदार निलेश राणे यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. अधिवेशनात देखील हा मुद्दा लावून धरला होता. आता ईदच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.